Afterthoughts Memento

The piece that inspired the name of this series.

cinema, nolan


...नेमका प्रॉब्लेम काय आहे ?

कधीतरी एखाद्या फार मोठ्या व्यक्तीचं मत ऐकल्या / वाचल्यामुळे असं होतं की तुम्ही ती गोष्ट अनुभवलेली नसतानाही तुमच्या मनात त्याविषयी ठाम समजूत निर्माण होते.कधी ती योग्य असते तर कधी सपशेल अयोग्य!

अशी समजूत झाल्यावर तुम्ही उत्सुकतेने ते अनुभव घ्यायला जाता, पण शेवटी कळतं की ऐकलं / वाचलं होतं ते सगळं खोटं आहे, संपूर्ण नसलं तरी बऱ्यापैकी विरुद्ध आहे.पण मग विचार येतो की ती माननीय व्यक्ती असं का बोलेल ? उगाच काहीतरी बरळून तिला काहीच मिळणार नाहीये.म्हणजे ते सगळं खरं असण्याचीही शक्यता आहे.मग जर ते खरं असेल तर आपल्याला त्याची प्रत्यक्ष अनुभूती कशी नाही आली ? आपण कुठे चुकतोय का ? की आपण ह्यांच्यापेक्षा वेगळे असल्यामुळे त्यांच्यासाठी असलेली विशेष गोष्ट ही तुमच्यासाठी सर्वसामान्य असेल ? ती अनुभूती आपल्याला येऊनसुद्धा गेली असेल पण आपल्याला ती महत्वाची वाटली नसेल; आपल्याला ती समजली नसेल किंवा आपण समजून घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला नसेल.असंही असेल की आपण अजून खरोखरच लहान आहात आणि आपल्याला ते समजायला अजून काही वेळ लागेल. म्हणजे कुठेतरी आत आपल्याकडून कुठलीतरी चूक होते आहे किंवा आपल्याला त्यातलं समजतच नाहीये किंवा आम्ही समजूनही न समाजल्यासारखं करत आहोत...

...नेमका प्रॉब्लेम काय आहे ?

[मेमेन्टो पाहिल्यावर मनात आलेले विचार]